श्रीदेवीसाठी पहायचा इंग्लिश…विंग्लीश

शशी हे चित्रपटातील मुख्य पात्र. ती घरी आपला पती (आदिल हुसैन) आणि तिच्या दोन मुलांबरोबर हिंदी बोलते. तिच्या नव-याची हिंदी भाषा खूप उत्कृष्ट आहे असे मुळीच नाही. शशीच्या नव-याचे तोडके हिंदी बोलण्याचा तसा या चित्रपटाशी काही विशेष संबंध नाहीये. शशीला नीट इंग्रजी बोलता न येणे हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.

शहरी भागात फक्त इंग्रजी बोलणेच पुरेसे नाही. तर तुम्हाला ब्रिटेनच्या महाराणीसारखे इंग्रजी बोलता आले पाहिजे. इंग्रजी बोलताना होणा-या व्याकरणाच्या चुका किंवा चुकीचे उच्चारामुळे तुम्ही लगेचच थट्टेचा विषय ठरु शकता. शशी जॅझ  चा उच्चार झाज असा करते. तेव्हा तिची १३ वर्षांची मुलगी तिला हसते. त्यामुळे अशी तोडकी मोडकी इंग्रजी बोलणा-या शशीचे मित्र असणे तर लांबचीच गोष्ट आहे.
त्यामुळे शशीचा आत्मविश्वास थोडा कमी झाला आहे.

वरवर पाहता पारंपारिक साडीत दिसणारी चाळीशीतली शशी मध्यमवर्गीय घरातली सुंदर, सुशील गृहिणी आहे. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसे आपल्याला कळते की, आई आणि पत्नी असणे ही काही साधीसोपी गोष्ट नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून चूल आणि मुल हेच तिचे आयुष्य आहे. हे प्रत्येक गृहिणीचे आदर्श काम आहे. शशीच्या कामाच्या महत्त्वाला नगण्य ठरवले जाते. कदाचित स्वतः शशीलासुद्धा स्वतःच्या कामाचे महत्व कळत नाहीये. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीत एक कलागुण लपलेला असतो तसेच शशीमध्ये सुद्धा एक विशिष्ट गुण आहे. शशी उत्कृष्ट लाडू तयार करते. 

लम्हें, चांदनी, चालबाज या चित्रपटांमध्ये दिसलेल्या बबली, चंचल श्रीदेवीने या चित्रपटात शशीची भूमिका साकारली आहे. गेल्या एका दशकात मी या अभिनेत्रीच्या इतक्या चाहत्यांना भेटलो आहे की, श्रीदेवीला ’श्री श्रीदेवी’ असे म्हटले पाहिजे.श्रीदेवीला भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हटले जाते. याचे कारण सांगणे तसे कठीण आहे. जगाच्या पाठीवर प्रेक्षक आणि कलाकारामध्ये असलेले नाते हे सारखेच असते. मात्र, या नात्याचा जास्त संबंध चित्रपटांबरोबर येत नाही.

हा चित्रपट श्रीदेवीचा कमबॅक चित्रपट म्हणावा लागेल. एक काळात लोकप्रियतेच्या यशोशिखरावर असलेला कलाकार बराच काळ चित्रपटांमध्ये दिसला नाही तर त्याच्या नवीन चित्रपटासाठी कमबॅक या शब्दाचा वापर केला जातो. कलाकार हा शेवटी कलाकारच असतो. वास्तविक पाहता कमबॅक हे प्रेक्षकांचे असते. मात्र आता तेच प्रेक्षक पुन्हा त्या कलाकाराचा चित्रपट बघायला येतील का, ही गोष्ट त्यांनी त्या कलाकाराचे चित्रपट बघणे का बंद केले होते, यावर अवलंबून असते.श्रीदेवी आता ४९ वर्षांची झाली आहे. श्रीदेवीच्या उपस्थितीने चित्रपट चांगला झाला आहे.

या चित्रपटाचे निर्माते आर. बाल्की यांनी अमिताभ बच्चन यांना ’चिनी कम’मध्ये एक चांगली भूमिका साकारण्याची संधी दिली होती. 

या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे बाल्की यांची पत्नी आहे.साधी सरळ, मनाला भावणारी गोष्ट उत्कृष्टरित्या कशी दाखवली जाईल यावर गौरी शिंदे यांनी भर दिला आहे. श्रीदेवीच्या लोकप्रियतेचा फायदा ही गोष्ट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होणार आहे. आणि तो नक्कीच व्हायलाही पाहिजे.