वॉशिंग्टन – वैज्ञानिकांनी तीव्र विशात ही जिवंत राहू शकणारा जिवाणू शोधला असून हा जीवाणू २४ कॅरेट सोने उत्पादनात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.
शुद्ध सोने बनविणारे जीवाणू
मिशिगन स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी शोधलेला कुप्रिविडस मेटलिडुरान्स हा जीवाणु गोल्ड क्लोराइड किंवा तरळ सोन्यात जीवित राहू शकतो. गोल्ड क्लोराइड निसर्गात आढळणारे अत्यंत विषारी मिश्रण आहे.
संशोधकांनी केलेल्या प्रयोगात या जीवाणुला भोजन रूपात गोल्ड क्लोराइड दिले आणि सुमारे एक आठवड्यानंतर असे आढळले की या जीवाणुने त्या विषारी मिश्रणाचे सोन्यात परिवर्तन केले.
माइक्रोबायोलॉजी व मॉलेक्यूलर जेनेटिक्सचे सहाय्यक प्रा. काजम कश्फी म्हणाले, आम्ही माइक्रोबियल अल्केमीची प्रक्रिया अवलंबत आहोत… आम्ही अशा पदार्थाने सोन्याचे उत्पादन करत आहोत. द ग्रेट वर्क ऑफ द मेटल लवर’ मध्ये संशोधकांनी तरल सोन्याला २४ कॅरेट ठोस सोन्यात परिवर्तीत करण्यासाठी बायोटेक्नोलॉजी, कला व अल्केमीचा उपयोग केला. ऑस्ट्रीया येथील प्रिक्स आर्स इलेक्ट्रोनिकाच्या आर्ट स्पर्धेत हा शोध मांडला गेला आहे.
