मोबाईल रोखणार महिलांवरील अत्याचार

न्यूयॉर्क – एखाद्या महिलेवर  लैंगिक अत्याचार होत असेल तर त्याबाबत सतर्क करणारे मोबाईल अॅप्लिकेशन नुकतेच लॉन्च करण्यात आले असून या अॅपमुळे संकटात असणार्‍या महिलांना तत्काळ मदत मिळविता येणार आहे. या अॅपद्वारे आपल्यावर अत्याचार होत असल्याची माहिती पीडित महिला पोलिसांसह तिचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींना क्षणात देवू शकणार आहे .

लाइफ लाइन रिस्पॉन्स असे या अॅप्लिकेशनचे नाव आहे. एका अमेरिकन कंपनीने हे लॉन्च केले आहे. आयफोन आणि अँड्राईड फोनवर हे अॅप कार्य करू शकते. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचे मोबाइल नंबर आणि ई-मेल अड्रेस यात साठवून ठेवले जातात. सध्या हे अॅप अमेरिकेत सुरू करण्यात आले आहे. संकट काळात हे अॅप कार्यान्वित केल्यानंतर क्षणात त्याचा सतर्क कॉल संबंधित नंबर्सवर येतो.