
नवी दिल्ली दि.३ – श्रीलंकेतील अंतर्गत यादवीत विस्थापित होण्याची पाळी आलेल्या ४३ हजार तमीळ कुटुंबासाठी भारत सरकारने श्रीलंकेतच गृहप्रकल्प योजना चालविली असून त्यासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचे मंगळवारी, गांधी जयंतीचे निमित्त साधून जाहीर करण्यात आले. श्रीलंकेच्या उत्तर भागात व जाफना जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत या अगोदर १० हजार घरे बांधली गेली असून आता दुसर्या टप्प्याच्या कामाची सुरवात करण्यात येत आहे. श्रीलंकेचे अर्थविकास मंत्री बसील राजपक्षे आणि भारतीय उच्चायुक्त अशोक कांथा हे दोघे या उद्घाटन समारंभाला हजर होते.
