ऐश करणार लवकरच एन्ट्री

दिग्दर्शक मनीरत्नम सध्या फेमस नॉवल ‘रेबेका’चा हिंदी स्क्रिप्ट तयार करीत आहेत. या सिनेमातून बॉलीवूडची विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय पुनरागमन करण्याची शक्यता आहे. जून २०११ पासून तिने प्रेग्नट असल्याच्या कारणावरून तिने बॉलीवूडला रामराम केला होता. रियल लाईफमध्ये आईची भूमिका साकारल्यानंतर आता ऐश कॅमेरासमोर येण्यास पुन्हा सज्ज झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या बॉलीवूडमध्ये लवकरच पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी बऱ्याच मोठ्या दिग्दर्शकाच्या ऑफर तिला आल्या आहेत. मात्र तिने मणीरत्नमच्या सिनेमातून एन्ट्री करण्याचे फिक्स केले आहे. मनीरत्नामचा हा सिनेमा १९३८ सालच्या फेमस नॉवलवर आधारित असलेल्या ‘रेबेका’ या हिंदी वर्जनची पुनरावर्ती असणार आहे.

ऐशने १९९७ साली ‘इरुवर’ या मणीरत्नमच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा एन्ट्री केली होती. त्यानंतर ‘गुरु’ व ‘रावण’ मध्ये सुद्धा ऐशने प्रमुख रोल केला होता. काही दिवसापूर्वीच मनीने ऐश्वर्याकडे या सिनेमाची ऑफर ठेवली असून आतापर्यंत तरी ऐशने नकार दर्शविला नसल्याने ती या सिनेमातून पुनरागमन करणार असल्याच्या वृतास सूत्रांने दुजोरा दिला आहे.