हिमाचल प्रदेशात भूकंप

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेश मंगळवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. राज्याच्या अर्ध्या भागात हा भूकंप जाणवला. या भूकंपाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा, मंडी, कांगडा यासह राज्याच्या निम्म्या भागात भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचे केंद्र पालमपूर आणि मंडी यांच्या मध्ये असलेल्या जोगेंद्रनगरजवळ असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.