पुणे: जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांवर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात आल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
एकट्या जलसंपदा विभागावरच श्वेतपत्रिका का; या अजित पवारांच्या प्रश्नावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. कोळसा घोटाळ्यावरून काँग्रेसवर होणार्या आरोपांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्यावर आरोप केले जात असल्याची टीका अजित पवार यांनी नुकतीच केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया देण्यासही मुख्यमंत्र्यांनी नकार दिला.