एसटी नदीत कोसळून ३० ठार

बुलडाणा: शेगावाकडे निघालेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाची बस पूर्णा नदीत कोसळून ३० प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे. या बसमधील एकही प्रवासी अद्याप जिवंत बाहेर पडू शकलेला नाही. मृतांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

बुधवारी सकाळी नौच्या दरम्यान पातुर्डा येथून शेगावकडे निघालेली एसटी बस संग्रमापूल तालुक्यातील खिरोदा फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. या बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे प्रयतन करतानाच स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व मृतदेहच हाती लागले.