बगळूरू: बनावट ओळखपत्राच्या आधारे इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आवारात घुसून शास्त्रज्ञ असल्याचा आव आणणार्या महिलेला बंगळूरू पोलिसांनी अटक केली.

बगळूरू: बनावट ओळखपत्राच्या आधारे इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आवारात घुसून शास्त्रज्ञ असल्याचा आव आणणार्या महिलेला बंगळूरू पोलिसांनी अटक केली.
ही महिला इस्रोच्या आवारात संशयास्पदरित्या वावरताना आढळली. त्यामुळे मुख्यालयाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी हिला हटकले. त्यावेळी तिने इस्रोचे ओळखपत्रही दाखविले. या ओळखपत्रावर ती शास्त्रज्ञ असल्याचा उल्लेख होता. मात्र काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर ते ओळखपत्र बनावट असल्याचे जवानांच्या लक्षात आले. या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे अनेक बनावट ओळखपत्रे आढळून आली आहेत.
या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल करून या महिलेला अटक केली आहे.