केट -विल्यम्सच्या विवाहाचा केक लिलावात

ड्यूक अॅन्ड डचेस ऑफ केंब्रिज म्हणजेच प्रिन्स विल्यम्स आणि केट यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेडिंग केकचा दुसरा तुकडा लिलावासाठी काढण्यात आला असून या केकच्या पहिल्या स्लाईसला १९१७ पौंडांची बोली मिळाली होती. ऑन लाईन ऑक्शन हाऊस पीएफसी कडे हा केक लिलावासाठी आला आहे. एका अज्ञात संग्राहकाने तो दिला असून या वेडिग केकचे ६५० पिसेस त्यावेळी उपस्थित असणार्‍या पाहुणेमंडळींना दुपारच्या रिसेप्शनमध्ये सर्व्ह करण्यात आले होते. केट आणि विल्सम्सचा विवाह गतवर्षी एप्रिलमध्ये बकींगहॅम पॅलेस येथे साजरा झाला होता. फियाना कर्नस हिने अन्य तीन सहकार्‍यांच्या सहाय्याने हा केक तयार केला होता.

शाही विवाहसोहळ्यातील अन्य तीन विवाहातील केकही याच कंपनीने लिलावात विकले असून त्यात १९८१ मध्ये पार पडलेल्या प्रिन्स चार्लस आणि लेडी डायना, १९८६ साली पार पडलेल्या प्रिन्स अँड्रू आणि सारा फर्गसन तसेच १९७३ साली पार पडलेल्या प्रिन्सेस अॅना आणि कॅप्टन मार्क फिलिप्स यांच्या विवाह केकचा समावेश आहे. हे तीनही केक अत्यंत उत्तम पद्धतीने जतन करण्यात आले आहेत.

केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरातील संग्राहक रॉयल फॅमिलीच्या वैयक्तीक वस्तू विकत घेण्यासाठी उत्सुक असतात आणि विवाहातील केक ही सर्वात महत्त्वाची वैयक्तीक वस्तू समजली जाते असे ऑक्शन कंपनीने नमूद केले असून चार्लस डायना विवाहाचा केकचा शेवटचा तुकडा १७५६ पौंडस ला मे २०१२ मध्ये विकला गेला होता असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment