नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात अपेक्षित फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीकडे राजकीय क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलांची दिशा ठरणे अपेक्षित आहे.
या भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या नेत्यांनी सोमवारी सकाळपासून सोनियांच्या १० जनपथ या निवासस्थानी हजेरी लावली. या नेत्यांमध्ये गुलाम नबी aआझाद, सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे.
मंत्रिमंडळात फेरबदलाचे नियोजन करताना काँग्रेस महासचिव राहुल गाधी यांचा समावेश करण्याची कोणतीही चर्चा काँग्रेस वर्तुळात होत नाही. कदाचित मंत्रिमंडळात समावेश करण्याऐवजी राहुल याच्याकडे पक्ष संघटनेची महत्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे; असे काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आक्रमक पवित्र पाहता सोमवारच्या केबिनेत बैठकीत आणखी काही धाडसी निर्णय जाहीर होयाचे शक्यता असून त्यामध्ये अनुदान घटविल्यामुळे रेशनिंगवर मिळणार्या साखरेचे दर साडे तेरा रुपयांवरून २५ रुपयांवर नेण्याच्या निर्णयाचा अमावेश आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ घातलेल्या फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कही नेत्यांची महत्वाच्या पदावर वर्णी लागू शकते. त्यपैकी सर्वात आघडीवर नाव आहे ते उद्योगमंत्री नारायण राणे यांचे! आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि काँग्रेसची प्रतिमा सुधारण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांची महाराष्ट्रात करण्यात आलेली रवानगी आणि विलासराव देशमुखांचे निधन या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि राज्यात पक्ष नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राणे यांच्यासारख्या आक्रमक पण काँग्रेसच्या मुशीत मुरू लागलेल्या नेत्याची महत्वाच्या जागी वर्णी लागण्याची चिन्ह आहेत. त्याच प्रमाणे विदर्भातील काँग्रेसचे एकमेव खासदार विलास मुत्तेमवार, मुंबईला प्रतिनिधित्व देण्यासाठी गुरुदास कामत, प्रिया दत्त अथवा एकनाथ गायकवाड यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.