गुरू नित्यानंद बिग बॉस -६ मध्ये झळकणार

वादग्रस्त गुरू स्वामी नित्यानंद बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या सहाव्या भागात सामील होणार असल्याची खबर आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रणजिता हिने या स्वामींनी तिच्यावर चाळीसपेक्षा अधिक वेळा बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर हे गुरू एकदम चर्चेत आले होते. रणजिता नंतर अनेक महिलांनी या स्वामींनी त्यांचा लैगिक छळ केला असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर ते कांही काळ फरार झाले होते व पोलिसांनी त्यांना शोधून काढून अटकही केली होती.या स्वघोषित अध्यात्मिक गुरूने प्रचंड संपत्तीही जमविली असल्याचे बोलले जात आहे.

मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नित्यानंदांशी संपर्क साधला गेला असला तरी त्यांच्या सहभागाबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. बिग बॉसच्या पाचव्या सत्रात स्वामी अग्निवेश यांनीही बिगबॉस हाऊसला भेट देऊन सामाजिक प्रश्नाबाबत व भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यासाठी कांही वेळ भेट दिली होती. त्यानंतर आता नित्यानंदांच्या रूपात दुसरे स्वामी बिग बॉसमध्ये सामील होणार आहेत. कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान याने यंदाच्या सीझनमधील शो कुटुंबासह पाहण्यासारखे असल्याचे सांगितले असून हा सीझन ७ आकटोबरपासून सुरू होत आहे.