अहमदाबाद: जगद्विख्यात जादूगार के. लाल यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे जादूगार मुलगा हसू उर्फ ज्युनिअर के. लाल, पत्नी पुष्पा आणि दोन मुली असा परिवार आहे.

अहमदाबाद: जगद्विख्यात जादूगार के. लाल यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे जादूगार मुलगा हसू उर्फ ज्युनिअर के. लाल, पत्नी पुष्पा आणि दोन मुली असा परिवार आहे.
के. लाल यांनी जगभर प्रवास करून जादूचे २२ हजार ४०० कार्यक्रम सदर करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. कांतीलाल व्होरा असे त्यांचे पूर्ण नाव होते. मात्र ते जगभरात के. लाल याच नावाने प्रसिद्ध होते.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोडी यांच्यासह अनेक मान्यवरांनी के. लाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.