हरिद्वार: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि यांच्या टीम मध्ये फूट पाडल्याचा केला जाणारा आरोप योग गुरू बाबा रामदेव यांनी फेटाळून लावला. असे उद्योग करण्यात मला रस नाही; असे सांगत असे आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते; असेही बाबांनी स्पष्ट केले.

हजारे यांनी दिल्लीत केजरीवाल यांचे भेट घेऊन त्यांच्या पक्ष स्थापनेशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. राजकीय उपक्रमासाठी आपले नाव आणि छायाचित्र न वापरण्याची सूचनाही त्यांनी केजरीवाल यांना केली. त्याच दिवशी अण्णांनी रामदेव बाबांचीही भेट घेतली.
सन २०१४ च्या निवडणुकीत मतदारांचे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने अण्णा आणि आपण एकत्रितपणे काय करू शकतो; याचा विचार करण्यासाठी ही भेट झाल्याचे बाबांनी पत्रकारांना सांगितले. दिल्लीतील जंतर मंतर येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलनही पुढे ढकलल्याचे बाबांनी सांगितले. त्या ऐवजी देशातील ६५० जिल्ह्यांच्या ठिकाणी स्वदेशी आंदोलन केले जाणार आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीशी फारकत घेऊन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली वाघिणीची प्रतिमा सार्थ असल्याचे दाखवून दिले; असे मत बाबांनी व्यक्त केले. रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचे समर्थन करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेली विधाने म्हणजे ते पंतप्रधान असण्यापेक्षा वॉलमार्टसारख्या विदेशी कंपनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत असे वाटावे; अशीच असल्याची टीकाही रामदेव बाबांनी केली.