पोलंडला गुजरातेत गुंतवणूक करण्यात रस

वॉरसा: गुजरातची जिवंत अर्थव्यवस्था पोलंडसाठी अनुकरणीय असून पोलंड गुजरातमध्ये; विशेषत: अपारंपरिक उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे; असे पोलंडच्या अर्थ राज्य मंत्री मिकीस्ला कास्प्रजक यांनी जेहीर केले. पुढच्या वर्षी पोलंडची विमान कंपनी एलओटी नवी दिल्लीपर्यंत थेट विमानसेवाही सुरू करेल.

पोलंडला भारताशी; विशेष करून गुजरातशी व्यापारी संबंध दृढ करण्याची इच्छा असल्याचे सांगून कास्प्रजक यांनी जानेवारी २०१३ मध्ये होणार्या व्हायाब्रांत गुजरात या विश्व परिषदेत पोलंडचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये राज्य सरकारबरोबर संयुक्तपणे अपारंपरिक उर्जा प्रकल्प उभारण्यात पोलंडला रस असल्याचे त्यांनी सांगितले.