‘भारताने चीन, पाकिस्तानशी संघर्षास सज्ज रहावे’

वॉशिंगटन: केवळ अणुबॉम्बची क्षमता असल्याने युद्धाची संभावना कमी होत नसल्याचा धडा कारगिल युद्धाने दिला असून भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान आणि चीनबरोबर दोन हात करण्यासाठी सिद्ध असणे आवश्यक आहे; असे मत अमेरिकन संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एअर पॉवर अ‍ॅट १८००० या शोधनिबंध संग्रहात ‘दि इंडियन एअरफोर्स इन कारगिल वॉर’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखात; केवळ अण्वस्त्रसिद्धतेने युद्ध तालात नाही; हे कारगिल युद्धाने दाखवून दिल्याचे म्हटले आहे. भारताच्या उत्तर सीमेवर पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून अण्वस्त्र विरहीत युद्धाचा धोका असून भारतीय सैन्य दलांनी त्यासाठी सज्ज राहावे; असेही या लेखात म्हटले आहे.

Leave a Comment