विनाअनुदानित गॅस सिलिंडरवरील सर्व कर माफ

नवी दिल्ली, दि. २१ – विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील सर्व कर माफ करण्याचा निर्णय शुक्रवारी केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे एका कुटुंबाला वर्षाला केवळ सहा अनुदानित गॅस सिलिंडर मिळाल्यानंतर त्या पुढील गॅस सिलिंडर १४० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी  शुक्रवारी केली.  गेल्या आठवड्यात वर्षाला फक्त सहा गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे अनुदानित सहा गॅस सिलिंडर सोडून त्या पुढील प्रत्येक विनाअनुदानित सिलिंडर साठी  ८९५ मोजावे लागणार होते. मात्र आता कर कमी केल्यामुळे हाच सिलिंडर सुमारे १४० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.