
नवी दिल्ली दि.१८- अॅपलच्या आयफोन पाच साठीचे बुकींग १४ सप्टेंबरपासून सुरू झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात २० लाख प्री ऑर्डर बुकींग झाले असून आयफोन चार एसच्या दिवसांत १० लाख बुकींगचा विक्रम यामुळे मोडला गेला आहे. एटी अॅन्ड टी या यूएसमधील मोबाईल प्रोव्हायडरनेही त्यांच्यासाठी हा सर्वात फास्ट विकला गेलेला आयफोन ठरल्याचे सांगितले असून हा फोन २१ सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
