याहू कर्मचार्‍यांना मोफत स्मार्टफोन

जुलैमध्येच याहूची सूत्रे हाती घेतलेल्या पहिल्या महिला सीईओ मरिस मायर यांनी याहू कर्मचार्‍यांना आनंदाचा धक्का देणारा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. ‘ याहू स्मार्ट फोन्स- स्मार्ट फन‘ या नावाने जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार आता याहूच्या कर्मचार्‍यांना  आयओएस, अँड्राॅईड, विडोज-८ वर ऑपरेट होणार्‍या आयफोन ५, सॅमसंग गॅलॅक्सी एस थ्री ,एचटीसी वन एक्स, एचटीसी इव्हीओ फोर, नोकिया ल्युमिया ९२० यापैकी कोणताही त्यांच्या आवडीचा स्मार्टफोन मिळणार आहे. शिवाय कंपनी फोनची बिलेही भरणार आहे.

याहूमध्ये आजपर्यंत कार्पोरेट फोन म्हणून ब्लॅकबेरीचा वापर केला जात होता. पण आता ब्लॅकबेरी ऐवजी स्मार्टफोनचा वापर कार्पोरेट फोन म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याहू युजर्स जे फोन वापरतात ते याहूतील कर्मचार्‍यांनीही वापरावेत असा या निर्णयामागचा उद्देश असला तरी सध्या ही सुविधा फक्त अमेरिकेतील कर्मचार्‍यांनाच मिळणार आहे. अर्थात यासाठी कंपनीला लाखो डॉलर्सचा खर्च येणार आहे.

मरिसा यांनी याहूची सूत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांना कंपनीच्या कॅफेत मोफत लंच देण्याचा पहिला निर्णय घेतला होता.

Leave a Comment