गेल्या काही दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा असलेला करीना कपूर व सैफ अली खान यांचा विवाह १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुरुवाती पासूनच या लग्न समारंभात काही ना काही विघ्न येतच आहेत. एकीकडे सैफ व करीनाला शुभेच्छा देण्यासाठी हॉलिवूडचा स्टार ब्रेड पीट उपस्थित राहणार आहे. तर दुसरीकडे सैफचे भोपाल आणी हैदराबाद येथील पतोडी परिवारातील काही जवळचे नातेवाईक या लग्नाला येणार नसल्याचे समजते.
करीना-सैफच्या लग्नात विघ्न
पतोडी परिवारातील सूत्राने दिलेलेल्या माहितीनुसार सैफचे काकू व चुलत भाऊ या विवाह सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे समजते. सैफने या जवळच्या नातेवाईका पैकी काही जणांना निमंत्रण पाठवले आहे तर काही जणांना निमंत्रण पाठवले नाही. यामुळे ही मंडळी नाराज झाली आहे. त्यामुळेच हे सर्वजन या लग्न समारंभाच्या विरूद्ध असल्याने लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
दुसरीकडे सैफ व करीनाच्या घरी मात्र सध्या लगीनघाई जोरात सुरु आहे. भावाच्या या लग्न समारंभात सोहा व सबा या दोन्ही बहिणी मात्र पारंपारिक ड्रेस परिधान करणार आहेत. शर्मिला टागोरांने सैफच्या लग्नाचे कार्डवर रिंकू या तिच्या नंतर ठेवलेल्या नावाने सही करून निमंत्रण पाठविले आहे.
