नवराज यांच्या घरात सापडले आक्षेपार्ह चित्रण

मुंबई: विख्यात लेखिका अमृता प्रीतम यांचे पुत्र नवराज क्वात्रा यांच्या घरात अनेक अश्लील व्हिडीओ, छायाचित्र आणि सेक्स टोईज मुंबई पोलिसांना आढळून आली आहेत. ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून नवराज यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मुंबई येथे एकटेच राहणारे नवराज यांची दि. १४ सप्टेंबर रोजी बोरिवलीत त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. त्यांचा चित्रपटांना अर्थसहाय्य करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी दिल्लीत तर मुलगी परदेशात असतात.

त्यांच्या हत्येनंतर तपास करताना पोलिसांना त्यांच्या घरात ठिकठीकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावल्याचे आढळले आहे. या कॅमेर्‍यात अनेक युवतींचे आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रण असून त्यात बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि एक नवोदित अभिनेत्री आहे. तिचा पहिला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याशिवाय अन्य १९ जणींमध्ये मॉडेल्स आणि बार गर्ल्सचा समावेश आहे.

नवराज यांच्या कपाटात काही तरुणींची अश्लील छायाचित्र आणि १०२ सीडीजही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याशिवाय ५० हून अधिक सेक्स टोईज आणि व्हीयाग्राच्या ६०० गोळ्याही पोलिसांना मिळाल्या.

नवराज हे या युवतींना ब्लॅकमेल करीत असावे आणि त्यातूनच त्यांचा खून झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सध्या नवराज यांच्याकडे नियमित येणे जाणे असलेल्या ८ तरुणींसह १२ जणांकडे चौकशी सुरू केली असून चित्रीकरणात असलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्याकडेही चौकशी करण्यात येईल; असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सागितले.

Leave a Comment