श्रीहरीकोटा: भारताने रविवारी सकाळी ९ वाजून ५१ मिनिटाने अंतरिक्षात अवकाश यान रवाना करून अवकाशयान प्रक्षेपणाचे शतक गाठले. या यशाबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

फ्रान्स आणि जपानचे उपग्रह घेऊन भारताचे १०० वे यान श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून अंतरिक्षात रवाना झाले. पीएसएलव्ही प्रकारातील २१ व्या यानाचे हे उड्डाण आहे.
भारतासाठी हा प्रगतीचा मोठा टप्पा असून आता महत्वाकांक्षी मंगळ अभियानाकडे देशाचे लक्ष लागले आहे; असे पंतप्रधानांनी या प्रक्षेपणानंतर सांगितले.