नवी दिल्ली: नोकिया इंडियाने आशा सिरीजमध्ये दोन नवीन मोबाईलफोन आशा ३०५ आणि आशा ३११ बाजारात आणले आहेत. खास इंटरनेट वापरासाठी उपयुक्त असे हे फोन आहेत.

नवी दिल्ली: नोकिया इंडियाने आशा सिरीजमध्ये दोन नवीन मोबाईलफोन आशा ३०५ आणि आशा ३११ बाजारात आणले आहेत. खास इंटरनेट वापरासाठी उपयुक्त असे हे फोन आहेत.
वेगवान ब्राउझर, सोशल नेटवर्किंग आणि विविध अॅप्ससह आकर्षक युजर इंटरफेस असलेल्या या फोन्सची किंमत ५ ते ७ हजारा दरम्यान असून या फोन्सना भारतीय ग्राहक चांगला प्रतिसाद देतील; असा विश्वास कंपनीचे विपणन संचालक विरल ओझा यांनी व्यक्त केला. नोकिया ब्राउझर, नोकिया मेप्स आणि डीआरएम फ्री नोकिया म्युझिक यामुळे हे टचस्क्रीन फोन वापरताना स्मार्टफोनचा आनंद मिळेल असा दावाही त्यांनी केला.