२६//११ च्या हल्ल्यात लादेनही सहभागी

मुंबई: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा सहभाग असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर विभागाच्या हाती आली आहे. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी या कटाचा मास्टरमाईंड हाफीज सईद हा लादेनच्या सतत संपर्कात होता अशी माहिती त्यांनी भारतीय तपास यंत्रणांना दिली आहे.

हाफीज सईदला पकडण्यासाठी ५० कोटीचे बक्षीस लावण्यात आले आहे. हाफीज हल्ल्यापूर्वी लादेनच्या संपर्कात असल्याबाबत अनेक कागदपत्रे अमेरिकन गुप्तचर पथकाने हस्तगत केली आहेत. पाकिस्तानातील आबोटाबाद येथे अमेरिकन नौदलाच्या सील कमांडो पथकाने लादेन याचा खात्मा केला. त्यानंतर लादेनच्या निवासस्थानी अनेक कागदपत्र सापडली. या कागदपत्रांवरून लादेनचा २६/११ च्या हल्ल्यात महत्वाचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत असल्याचा अमेरिकन गुप्तचरांचा दावा आहे.

Leave a Comment