टॉक शो होस्ट करणारी ओफ्रा विनफ्रे ही जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी सेलिब्रिटी ठरली आहे. विनफ्रेची मागील वर्षाची कमाई १६.५ कोटी डॉलर होती.

टॉक शो होस्ट करणारी ओफ्रा विनफ्रे ही जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी सेलिब्रिटी ठरली आहे. विनफ्रेची मागील वर्षाची कमाई १६.५ कोटी डॉलर होती.
फोर्ब्सने केलेल्या सर्व्हेक्षणावरून विनफ्रेने मायकल बे आणि स्टिव्हन स्पीलबर्ग सारख्या दिग्गज दिग्दर्शकांना मागे टाकले आहे. फोर्ब्सने विनफ्रेला काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात शक्तीशाली महिलांमध्ये अकरावे स्थान दिले होते.
बे यांनी १६ कोटी डॉलर्सची कमाई केली. स्पीलबर्ग या यादीत तिसर्या स्थानावर आहेत. या दरम्यान स्पीलबर्ग यांनी १३ कोटी डॉलरर्सची कमाई केली. तर हॉलिवूडचे निर्माते जेरी ब्रकहिमर यांनी ११.५ कोटी डॉलरची भर आपल्या खात्यात टाकली आहे.