जागतिक अपेक्षापूर्तीत भारत अपयशी: नारायण मूर्ती

बंगळूरू: जगाच्या भारताकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र भारत त्या पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे; अशी खंत इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली.

देशाची आर्थिक परिस्थिती सन १९९१ पेक्षाही वाईट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आर्थिक बाबतीत शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. सरकारी निरुत्साहामुळे जगात भारताची प्रतिमा डागाळली आहे; असे मत नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना एक सादरीकरण देऊनही १४ महिन्यात त्यांना चर्चेसाठी वेळ मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.

पूर्वी जागतिक बाजारपेठेत तीन वेळा चीनचे नाव घेतल्यावर एकदा भारताचे नाव यायचे. आता ३० वेळा चीन म्हटले तरीही भारताचे नाव येत नसल्याचे नारायण मूर्ती यांनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र सरकारने आणि भारतीयांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे; असे आवाहनही त्यांनी केले.