रांझना माझ्या कारकीर्दीचा टर्णिंग पोईंट- सोनम कपूर

जानेवारी २०१२ मध्ये ‘प्लयेर’ हा सिनेमा प्रसिद्ध झाल्यानंतर बॉलीवूड मधून गायब झालली अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसापासून रॅम्पवर जलवे दाखवन्यात मात्र सध्या व्यस्त आहे. त्यामुळेच काही दिवसापासून तीचा कोणताच सिनेमा झळकला नाही. सध्या तिच्याकडे दिग्दर्शक आनंद रॉय यांचा ‘रांझना’ हा सिनेमा असून ती सध्या बनारस शहरात या सिनेमाच्या शूटमध्ये बीजी असल्याचे समजते.

या बहुचर्चित सिनेमा विषयी बोलताना सोनम म्हणाली, ‘रांझना या सिनेमाकडून मला खूप काही अपेक्षा आहेत. माझ्या कारकीर्दीच्या दृष्टीने हा सिनेमा महत्वपूर्ण असून, या मधील माझा अभिनय कारकीर्दीच्या दृष्टीने हा माइल स्टोन ठरणार आहे. या सिनेमामुळे आगामी काळात माझ्या कारकीर्दीस टर्णिंग पोईंट मिळणार आहे. त्यामुळे मी सर्व लक्ष अभिनयावर केंद्रित केले असून त्यासाठी मी हार्ड वर्क करीत आहे.’

काही दिवसापासून माझा एक ही सिनेमा प्रदर्शित झाला नसल्याने इंडस्ट्रीज मध्ये काही मंडळींनी अफवा पसरविल्या आहेत. मला लहानपणा पासूनच रॅम्प शो ची आवड आहे त्यामुळे मी त्यासाठी खूप वेळ घालवते. त्याबाबत जर मला कोणही बोलले तर मी त्याकडे केअर करीत नाही, असेही तिने यावेळी सांगितले. आगामी काळात ती ‘रांझना’ या सिनेमात ‘कोलवारी डी’ फेम धनुष सोबत झळकणार आहे.