गोध्रा: ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या हेलिकॉप्टरला येथील सायन्स कोलेज मैदानात अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचे ३ तुकडे झाले असून वैमानिक जखमी झाला आहे. आसाराम बापू मात्र सुरक्षित आहेत.
आसाराम बापूंच्या हेलिकॉप्टरला अपघात
आसाराम बापू सत्संगाच्या कार्यक्रमासाठी येथे आले असता त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताना अचानक कोसळले आणि त्याचे ३ तुकडे झाले.
वैमानिकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
