नवी दिल्ली: आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रीरामाच्या अस्तित्वाचे पुरावे शोधल्याचा दावा ‘इन्स्टिट्यूट फॉर साईण्टीफ़िक रिसर्च इन वेदाज’ या संस्थेने केला आहे. प्लेनेटेरीयम या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने जटील खगोलशास्त्रीय गणिते करून हे पुरावे मिळाले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाने पौराणिक घटनांचा मागोवा
प्रभू श्रीराम हे भारतीयांचे आराध्य दैवत असले तरीही त्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त करणारेही अनेक जण आहेत. भारतातील जगन्मान्य महाकाव्य रामायण आणि महाभारत हा इतिहास नसून काल्पनिक असल्याचा दावाही अनेक जण करतात. इन्स्टिट्यूटच्या संशोधक सरोज बाला यांनी खगोलशास्त्रीय गणिते करून श्रीरामाचा जन्म १० जानेवारी ई.स.पूर्व या दिवशी झाला असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय कालगणनेप्रमाणे तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमी हा होता; असा त्यांचा दावा आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत रामजन्म झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
प्लेनेटेरीयम या सॉफ्टवेअरद्वारे अत्यंत गुंतागुंतीची खगोलशास्त्रीय गणिते करून पौराणिक घटनांचा मागोवा घेण्याचे काम इन्स्टिट्यूटने हाती घेतले आहे.
