दिल्ली: शासनाच्या धोरणांवर; प्रामुख्याने सुरक्षा संबंधी धोरणांवर टीका केल्याबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक एन. सी. अस्थाना यांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्यावर सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कडक कारवाई होऊ शकते; असे संकेत संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ
अस्थाना व त्यांची पत्नी अंजली निर्मल यांनी संयुक्तपणे ‘इंडियाज इंटरनल सिक्युरिटी: द अॅक्चुअल कन्सर्न’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाने गृहमंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकात अस्थाना यांनी भारतातील अंतर्गत सुरक्षा विषयक धोरण आणि रणनीतीवर कठोर शब्दात टीका केली आहे. विशेषत: काश्मीरमध्ये शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे आणि त्यानुसार उचलल्या गेलेल्या पावलांमुळे शासनाच्या विरोधात निर्माण झालेल्या असंतोषाचे वर्णन त्यांनी या पुस्तकात विस्ताराने केले आहे.
