नवी दिल्ली दि.२८ – सतत सात सत्राच्या तेजीनंतर आज स्थानिक सराफा बाजारात पिवळा धातू १०० रुपये घसरून ३१ हजार ३०० रुपये प्रती दहा ग्राम झाला. एक दिवसापूर्वी सोन्याने ३१ हजार ४०० रुपये प्रती दहा ग्रामचे रेकॉर्ड बनवले होते. या सात सत्रात सोने ९६० रुपये वाढले होते. औद्योगिक युनिट मागणीच्या अभावात चांदी १०० रुपये घसरून ५७ हजार ६०० रुपये प्रती किलो झाली.
सिंगापुरच्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरून १६५७.५० डॉलरवर आले. एक दिवसापूर्वी याचा दर १६७६.९० डॉलर होता. या तेजीचा परिणाम घरगुती बाजाराच्या व्यापारी धारणेवरही पडला. स्थानिक सराफा बाजारात आज सोने आभूषणाचा दर १०० रुपयांनी उतरून ३१ हजार २०० रुपये प्रती दहा ग्राम झाला. आठ ग्रामची गिन्नी देखील ५० रुपये घसरून २४ हजार ७५० रुपये झाली. चांदी नाणे १००० रुपये घसरून ७१०००-७२००० रुपये प्रती शेकडावर बंद झाले. चांदी साप्ताहिक डिलेवरी २०० रुपये गमावून ५८ हजार रुपये प्रती किलो झाली.