डीएलएफ आयपीएलचे प्रायोजकत्व रद्द करणार

नवी दिल्ली दि.२८ – इंडियन प्रिमिअर लीगचे (आयपीएल) गेल्या पाच वर्षांपासून मुख्य प्रायोजक असलेली बांधकाम क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी डीएलएफने प्रायोजकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

डीएलएफ आणि आयपीएल यांच्यात गेल्या महिन्यात करार होणे अपेक्षित होते.  या दोघांमध्ये पाच वर्षांचा करार झाला होता, तो जुलै २०१२ मध्ये संपुष्टात आला आहे. कंपनीने क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना प्रसिद्धी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात डीएलएफने ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणार्‍या हरियाणातील खेळाडूंना ’ऑडी क्यू५’ कार भेट दिली होती. आयपीएलमधून बाहेर पडण्याचा आम्ही विचार केला असून, सध्या आम्ही देशभरात रियल इस्टेट क्षेत्रात डीएलएफची प्रसिद्धी करणार असल्याचे, कंपनीचे समुह कार्यकारी संचालक राजीव तलवार यांनी सांगितले.

Leave a Comment