अराफात यांच्या अवशेषांच्या घेणार चाचण्या

जिनेवा: दिवंगत पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता काय याचा शोध घेण्यासाठी अराफत यांच्या शरीराच्या अवशेषांची तपासणी करण्यात येणार आहे. स्वित्झर्लंड येथील लुसाने युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटरचे तज्ञ ही तपासणी करणार आहेत.

अराफात यांचा सन २००४ मध्ये पॅरीस जवळ एका रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलोनियम या रेडिओधर्मी विषारी पदार्थामुळे अराफात यांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांच्या पत्नी आणि मुलीने फ्रान्सच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. पेलेस्तिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनीही चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही तपासणी केली जाणार आहे.