ए. के. हंगल अत्यवस्थ

मुंबई: ज्येष्ठ चरित्र अभिनेते ए. के. हंगल यांची प्रकृती खालावली असून त्यांना सांताक्रूझ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

पाठीच्या दुखण्याने हंगल हे दीर्घ काळापासून त्रस्त आहेत. काही दिवसापूर्वी त्यांची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले. मात्र त्याचाही उपयोग होत नसल्याचे पाहून कृत्रिम श्वासही बंद करण्यात आला.

त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांचे पुत्र अजय हंगल यांनी सांगितले.

मधुबाला या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी नुकतेच काम केले. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे.