नवी दिल्ली: नवीन पासपोर्ट देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ३० दिवसांचा कालावधी निश्चित केला असून ही प्रतिक्रिया गतिमान करण्याचे आदेश सर्व प्रादेशिक पारपत्र कार्यालयांना देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: नवीन पासपोर्ट देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ३० दिवसांचा कालावधी निश्चित केला असून ही प्रतिक्रिया गतिमान करण्याचे आदेश सर्व प्रादेशिक पारपत्र कार्यालयांना देण्यात आले आहेत.
सध्या पासपोर्ट मिळविणे हे एक दिव्य होऊन बसले आहे. पासपोर्ट कार्यालयातील लांबलचक रांगांचा महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना मोठा त्रास होत आहे. मात्र ही अडचण लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने पावले उचलली आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार तत्काळ पासपोर्ट ७ दिवसात तर सामान्य पासपोर्ट १५ दिवसात मिळणार आहे. पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ‘वॉक इन’ सेवा दर्जेदार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: अंध, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांच्या आई- वडलांकडे वैध पासपोर्ट आहेत अशा १५ वर्षाखालील मुलांना या सुविधेअंतर्गत विशेष सेवा उपलब्ध होणार आहे.