न्यूझीलंडचा पहिला डाव गुंडाळला

न्यूझीलंड विरुद्ध हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपहारानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव संपला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे किवी फलंदाजांनी नांगी टाकल्याने त्यांचा पहिला डाव १५९ धावात आटोपला. फॉलोऑनच्या संकटामुळे किवी संघाचा दुसरा डाव सुरु झाला आहे. त्यांच्यावर पराभवाचे संकट ओढावले आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीपर्यंत चेतेश्वर पुजाराच्या १५९ धावा व कर्णधार धोनीच्या ६८ धावाच्या मदतीने ४३८ धावाचा डोंगर उभा केला होता. त्याचा मुकाबाला करीत असताना दुसऱ्या दिवशीच खेळ संपेपर्यंत ५ गडी बाद १०६ अशी अवस्था झाली होती. तिसरी दिवशी सकाळी खेळ थोडसा उशिरा सुरु झाला. मात्र किवीचा संघ मैदानावर फार काळ तग धरू शकला नाही.

जेम्स फ्रान्क्लीनने नाबाद ४१ धावा केल्या. उमेश यादवने गडी बाद करीत शनिवारच्या सकाळची सुरुवात केली. त्यानंतर प्रग्यान ओझाने आणखीन एक धक्का दिला. त्यानंतर अश्विनने एकाच षटकात दोन झटके देत किविचे शेपुट कापले. शेवटचे पाच फलंदाज केवळ ५३ धावा कडून बाद झाले. फिरकीपटू आर. अश्विनने ३१ धावा देऊन ६ गडी बाद करीत आतापर्यंतची सर्वोतम कामगिरी केली. ओझाने तीन तर उमेश यादवने एक बळी घेतला.

Leave a Comment