बॉलीवूड पाठोपाठ आता छोट्या पडद्यावरही झिरो साईजाची क्रेज आली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून टीवी सिरीयल मध्येही झीरो साइज असलेल्या नायिका पाहवयास मिळत आहेत. साइज कमी करण्यासाठी सध्या त्यांना बरीचसी कसरत करावी लागत असली तरी त्यासाठी परिश्रम घेताना दिसत आहेत.
छोट्या पडद्यावरही झिरो साईजची क्रेज
मस्त गर्ल असलेल्या करीना कपूरने ‘टशन’ सिनेमासाठी झिरो साइज केली होती. तिची ही साइज पाहून सर्वजन हैराण झाले होते. करीनामुळेच सर्व बॉलीवूडमधील हिरोइनने तिला फॉलो करीत वजन कमी केले आहे. त्यामुळे सर्वानाच आता करीना सारखी साईज कमी करावी अशी वाटत आहे. हा ट्रेंड सध्या टीवीवर सुद्धा आला असून सर्वजन सध्या तिची कॉपी करताना दिसत आहेत.
झिरो साइज करणाऱ्यामध्ये ‘एक हजारो मै मेरी बहना है’ मधील क्रिस्टल डिसूजा, ‘इस प्यार को मै क्या नाम दू’ मधील सन्या इराणी, ‘दिल से दिल दुआ’ मधील श्रुती झा, ‘सास बिना ससुराल’ मधील ऐश्वर्या सुखाजा व ‘उतरण’ मधील तीन दत्त तर ‘बालिका वधू’ मधील प्रत्युष बनर्जी यांचा समावेश आहे. सध्या या सर्व नायिका फिगर मेंटेन करण्याच्या पाठीमागे लागल्या असून त्यासाठी त्यांनी डायटिंग व जिमचा सहारा घेतला आहे.
