‘बिग बॉस’चा-६ सीजन आता फिक्स झाला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या सिझनला सुरुवात होणार आहे. याचा होस्ट म्हणून सलमान खानच काम पाहणार आहे. आता पर्यंत या शोमध्ये जगभरातील सेलेब्रेटीज सहभागी होऊन त्यांनी सर्वांची करमणूक केली आहे. मात्र आता या सिझन मध्ये सेलेब्रेटीज सोबतच सर्व सामान्यांना ही सहभागी होता येणार आहे.
‘बिग बॉस’ मध्ये मिळणार सर्वसामान्याला एन्ट्री
हे वाचून सर्वाना थोडेसे आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. सेलेब्रेटीज तर या शोचा हिस्सा असणारच आहेत. त्यासोबतच आता या रियालिटी शो मध्ये सर्वसामन्याना भाग येत येणार आहे. या शो मध्ये सहभागी होऊ इच्छीनाऱ्यासाठी कलर्स चॅनेलकडून एसएमएस आणि ऑनलाइन एन्ट्रीज मागविल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती वेबसाइटवर मिळणार आहे.
काही दिवसापूर्वीच सलमान खानने ‘बिग बॉस’ हा शो चांगला करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी संगितले होते. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सलमान खानच्या सूचना कलर्स चॅनेलवाल्यांनी फॉलो करण्याचे ठरविलेले दिसत आहे.
