गेल्या काही दिवसापासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन व त्यानंतर रामदेव बाबाचे आंदोलन यामुळे सगळा देश ढवळून निघला आहे. अशाताच आता बिग बी अमिताभ बच्चन व दिग्दर्शक प्रकाश झा यांचा ‘सत्यग्रह’ हा सिनेमा येत आहे. त्यामुळे आता सर्वाना झा आणि अमिताभच्या या ‘सत्यग्रह’ ची उत्सुकता लागून राहिली आहे.
काही दिवसापूर्वी प्रकाश झा यांच्या आरक्षण या सिनेमातून अमिताभ बच्चनने बरीच लोकप्रियता मिळवली होती. यामधील बिग बि च्या रोल मुळेच हा सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर झा यांनी ‘चक्रव्यूह’ सिनेमाच्या निर्मितीत स्वताला गुंतवून ठेवले होते. चक्रव्यूहचे शूट पूर्ण झाल्याने झा यांनी नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. यामध्ये मेन रोल हा अमिताभ बच्चनचा आहे. गेल्या वर्षी दिल्लीत क्रांती मैदानावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनावर आधरित हा सिनेमा असणार आहे.
या सिनेमात अमिताभ अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत झा अथवा बच्चनने पत्ते खुले केले नाहीत. येत्या काही दिवसातच ‘सत्यग्रह’ सिनेमाचे शूट सुरु होणार आहे.