अपप्रचार टाळण्यासाठी फेसबुक करणार सहकार्य

वॉशिंगटन: भारतातील परिस्थितीचे गांभिर्या लक्षात घेऊन फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या सोढाल नेटवर्किंग साईटने भारत सरकारला सहर्याचा हात पुढे केला आहे. फेसबुकवर अपलोड करण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याबरोबरच वारंवार आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्रण अपलोड करणाऱ्या आणि वेबसाईटचा गैरवापर करणार्यांची फेसबुक अकाऊण्ट्स बंद करण्याचा निर्वाळाही फेसबुकने दिला आहे.

ईशान्य भारतातील हिंसाचाराबाबत सोशल नेटवर्किंग साईट्स, एमएमएस आणि एसएमएसचा वापर करून अल्पसंख्यांकांना भडकावणारा विखारी अपप्रचार केल्याची बाब उघडकीला आली आहे. बनावट छायाचित्र, छायाचित्रण आणि भडकाऊ मजकूर अपलोड करून हिंसाचाराला प्रवृत्त केले जात आहे.

याबाबत भारत सरकारने केलेल्या विनंतीला प्रतिसाद देऊन आक्षेपार्ह मजकूर शोधून तो काढून टाकण्यासाठी आमचे भारत आणि अमेरिकेतील तंत्रज्ञ दिवस-रात्र काम करीत आहेत. असा मजकूर मोठ्या प्रमाणावर यापूर्वीच काढून एकाला आहे; असे फेसबुक व्यवस्थापनाच्या प्रवक्त्याने सांगितले.

फेसबुक वापरणारे भारतात ५ कोटी लोक असून त्यांनी देखील साईटवर उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर अपलोड झाला असल्यास तो निदर्शनास आणून द्यावा; तो तातडीने काढून टाकण्यात येईल; अशी ग्वाहीही या प्रवक्त्याने दिली.

Leave a Comment