काही दिवसापूर्वी दिया मिर्झाने लग्न केले असून, सध्या ती तिच्या लग्नानंतरच्या जीवनात आलेल्या अडचणीमुळे परेशान असल्याचा अफवा सर्वत्र पसरविण्यात आल्या आहेत. दिया सध्या तिच्या या लग्नाच्या बातमीने खुपच नर्वस झाली आहे. त्यामुळेच तिला मिडीयाला बोलवून मी लग्न केलेले नाही व सध्या तरी तसा काही प्लॅन नाही, असा खुलासा करावा लागला आहे.
काही दिवसापासून दियाने चोरी चोरी चूपके चुपके लग्न केल्याच्या अफवा सर्वत्र पसरविण्यात आल्या होत्या. दिया म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसापासून मिडियाकडून येत असलेल्या लग्नाच्या बातमीमुळे मी खूप नर्वस झाली आहे. मी अजून तरी लग्न केलेले नाही. लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तो माझ्या फॅन्स व मिडियापासून दूर ठेवणार नाही.’
दियाच्या लग्नाची अफवा ही काही पाहिल्यादा पसरविण्यात आली नाही. यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारची अफवा पसरविण्यात आली होती. दिया आणि साहिल संघा यांच्यातील अफेयरची चर्चा खूप दिवसापासून ऐकायला मिळते. साहिल हा तिचा बिजनेस पार्टनर आहे. दोघांनी मिळून एक प्रोडक्शन हाउस सुरु केले आहे. त्यांनी ‘लव ब्रेकअप जिंदगी’ या सिनेमाची निर्मिती केली होती, हा सिनेमा काही चालला नाही. त्यामुळे मात्र साहिल आणि दियाच्या रोमांसची चर्चा मात्र सर्वत्र ऐकावयास मिळाली.