शाहरुख पुन्हा होणार फौजी

शाहरुख खानने छोट्या पडद्यावरील ‘फौजी’ नावाच्या मालिकेतूनच त्याच्या करियरला सुरुवात केली होती. या मालिकेत त्याने अभिमन्यु रॉयची भूमिका केली होती. कारकीर्दीची सुरुवात या मालिकेपासून झाल्याने किंग खानला ही मालिका आवडत होती. त्यामुळेच त्याने पुन्हा आता फौजिची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात येत असलेल्या यश राजच्या एका सिनेमामध्ये तो सेना अधिकाऱ्याचा रोल करीत आहे.

१९८८ साली फौजी ही त्याची मलिका आली होती. भारतीय सेन्यातील कमंडो रेजिमेंटच्या ट्रेनिंगवर आधारित ही सिरीयल होती. त्यावेळी फौजीच्या वर्दीमध्ये शाहरुख खान हा खुपच छान दिसत होता. त्यानंतर १९९६ साली ‘आर्मी’ या सिनेमामध्ये शाहरुख खानने एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. त्यानंतर ‘मै हू नां’ मध्ये त्याने मेजर राम प्रसाद शर्मा याचा रोल केला होता. त्यानंतर २००४ साली आलेल्या ‘वीर जारा’ या सिनेमामध्ये शाहरुखने पायलट असलेल्या वीर प्रताप सिंहची भूमिका केली होती. त्यानंतर ‘भूतनाथ’ या सिनेमामध्ये ही त्याने क्रूज वरील इंजिनीयरची भूमिका केली होती.

त्यानंतर आता तो पुन्हा एकदा त्याच्या आवडत्या फौजीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सना या त्याच्या रोल विषयी उत्सुकता लागून राहीली आहे.

Leave a Comment