कोळसा घोटाळा प्रकरणी विरोधक आक्रमक

नवी दिल्ली: कोळसा घोटाळ्याबाबत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याचे मागणी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे सोनही सभागृहांचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

कॅगच्या अहवालात कोळसा खाण वाटप प्रकरणी सरकारने जनतेचे १ लाख ८६ हजार कोटी रूपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. या घोटाळ्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान सिंग यांनी राजीनामा द्यावी अशी विरोधकांची मागणी होती. या प्रश्नावरून गोंधळ वाढल्याने लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. मात्र गोंधळ सुरूच राहिल्याने बुधवार पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही पंतप्रधानांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.