’एक था टायगर’ : पाच दिवसात १२५ कोटींची कमाई

नवी दिल्ली,२१ ऑगस्ट-सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ’एक था टायगर’ १५ ऑगस्टला रिलीज झाला. गेल्या पाच दिवसात या चित्रपटाने १२५ कोटींचा गल्ला जमा केला आहे. पाच दिवसात भारतात १०० कोटींची कमाई केली तर, उर्वरित २५ कोटींचा गल्ला हा परदेशातून जमा झाला आहे. यात सोमवारी असलेल्या ईदीच्या कमाईचा समावेश नाही.

बुधवारी चित्रपटाने ३३ कोटी, गुरुवारी १४.५२ कोटी, शुक्रवारी १२.९० कोटी, शनिवारी १६.७५ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने सलमानच्या ’टायगर’ने झेप घेतली आहे. ट्रेंड तज्ज्ञ तरण आदर्श यांनी आज केलेल्या टिवटमध्ये म्हटले आहे, सोमवार ते बुधवार ’एक था टायगर’ जोरदार व्यवसाय करणार आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३२ कोटींचा व्यवसायकरुन खळबळ उडवून दिली होती. तज्ज्ञांचे मत आहे की, हा चित्रपट ३०० कोटींच्या आकड्यालाही गवसणी घालू शकतो.