अहमदनगर: आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या सहभागाअभावी लोकपाल विधेयक संमत न होण्याचे कारण देणे हे पंतप्रधानांनी देशाची केलेली फसवणूक असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

अहमदनगर: आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या सहभागाअभावी लोकपाल विधेयक संमत न होण्याचे कारण देणे हे पंतप्रधानांनी देशाची केलेली फसवणूक असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.
राजकीय पर्याय देण्याची ग्वाही देऊन दिल्ली येथील आंदोलन मागे घेतल्यानंतर अण्णा यांनी प्रथमच जाहीर विधान केले. अण्णांनी ब्लॉगच्या माध्यमातून पंतप्रधान मनमोहन सिंग हे देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.
लोकसभेत संमत करण्यात आलेले लोकपाल विधेयक हे कुचकामी असून त्याचा जनतेला लाभ होणार नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही; असे अण्णांनी ब्लॉगवर नमूद केले आहे.