मुंबई: थकीत वेतनाच्या मागणीसाठी किंग फिशर एअरलाईन्सचे वैमानिक अचानक संपावर गेले आहेत. त्यामुळे कंपनीच्या सात विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

मुंबई: थकीत वेतनाच्या मागणीसाठी किंग फिशर एअरलाईन्सचे वैमानिक अचानक संपावर गेले आहेत. त्यामुळे कंपनीच्या सात विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या किंग फिशरच्या वैमानिकांना मार्च महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वेतनाच्या मागणीसाठी वैमानिकांच्या संघटनेने यापूर्वीही संप केला होता. त्यावेळी दि. १७ ओगस्ट पर्यंत सर्व थकीत वेतन चुकते करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिल्याने संप मागे घेण्यात आला.
मात्र ठरलेल्या दिवशी वेतन न मिळाल्याने संघटनेने कंपनीचे कार्यकारी संचालक संजय आगरवाल यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा निष्फळ ठरल्याने वैमानिकांनी पुन्हा संपाचे हत्यार उगारले आहे.
या संपामुळे कंपनीची विमान सेवा विस्कळीत झाली आहे.