नवी दिल्ली: मध्यमवर्गीयांची कार अशी ओळख मिळविलेल्या टाटाची नॅनो कारचा प्रसार करण्यासाठी टाटा समूहातील कंपन्या नॅनो या नावाखाली अन्य ग्राह्कोपयोगी उत्पादने बाजारपेठेत आणत आहेत. या उत्पादनांची खरेदी ऑनलाईनही करता येणार आहे. त्यासाठी कंपनीने ई बे या ई-कॉमर्समधील आघाडीच्या कंपनीशी करार केला आहे.
ई बे कंपनीच्या संकेतस्थळावरून नॅनो या ब्रँडखाली टी शर्ट्स, घड्याळे, पेन ड्राईव्ह, संगणकाचे माऊस, टोप्या आणि की-चेन अशा अनेक ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी करता येईल. या कंपनीची सुविधा अनेक लहान- मोठ्या शहरात उपलब्ध असल्याने या ठिकाणापर्यंत नॅनो ब्रँड पोहोचवणे या करारामुळे शक्य होणार असल्याचे टाटा मोटर्स च्या उत्पादन प्रकल्पाचे प्रमुख देल्ना अव्हरी यांनी सांगितले.