पुणे: पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी एका निवासी इमारतीत स्फोट होऊन एक मुलगा जखमी झाला. साखळी स्फोटाच्या आठवणी जाग्या असतानाच झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांचे प्राथमिक निरीक्षण आहे.

शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील डांगे चौकात असणार्या लक्ष्मी तारा या निवासी इमारतीच्या जिन्यावर हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता अत्यंत सौम्य स्वरूपाची होती. मात्र या स्फोटात पियुश वाळूंज हा चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक पथकही दाखल झाले असून हा स्फोट नेमका कशाचा होता याचा तपास सुरू आहे.