मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत ९ बिलीयन डॉलर्सची घट

फेसबुक या सोशल नेटवर्कचा शेअर गुरूवारी शेअर बाजारात एकदम घसरल्याने फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्या संपत्तीत ९ बिलीयन डॉलर्सने घट झाली आहे. फेसबुकचा आयपीओ मे मध्ये मोठ्या वाजतगाजत बाजारात आला आणि त्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसादही दिला. मात्र नंतर त्यात महसूल वाढ नोंदविली गेली नाही. या शेअरसाठी असलेला तीन महिन्यांचा लॉकींग पिरीयड संपताच गुरूवारी २७० दशलक्ष शेअर्स बाजारात विक्रीला आले. त्यात रशियाच्या डीएसटी लिमीटेड आणि मेल रू यांचा मोठा वाटा आहे. या वर्षैअखेरी आणखी १.४ बिलीयन अतिरिक्त शेअर्सची बाजारात येण्याची शक्यता असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

मेच्या १८ तारखेला पहिला इश्यू येताच ४२१ दशलक्ष शेअर्स विकून फेसबुक १०० बिलीयन मार्क नोंदविणारी पहिली अमेरिकन कंपनी ठरली होती. त्यावेळी या शेअरची किमत ३८ डॉलर्स प्रति शेअर होती. ती गुरूवारी घसरून हा शेअर १९.८७ डॉलर्सवर घसरला आहे. या घसरणीमुळे कंपनीचेही ५० बिलीयन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Leave a Comment