इशाला वाटते भीती

काही दिवसापासून इशा गुप्ता बोल्ड भूमिका करताना दिसत आहे. एकीकडे ती प्रकाश झाच्या ‘चक्रव्यूह’ मध्ये नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका ती साकारत आहे. तर विक्रम भट्टच्या ‘राज-३’ मध्ये प्रमुख भूमिका करीत आहे.

गेल्या काही दिवसापासून ‘राज-३’ चे शूट सुरु आहे. इशाला एक सीन खूप उंचीवर जाऊन करायचा होता. मात्र तिला उंचीची भीती वाटत असल्याने सुरुवातीला हा सीन करण्यास तिने नकार दर्शविला. त्यानंतर विक्रम भट्टने तिला समजावून सांगीतल्यानंतर हा सीन करण्याची तयारी तिने दर्शविली. इशा शूटसाठी उंच असलेल्या ठिकाणी तर चढली मात्र कॅमेरापुढे मात्र कित्येक रिटेक घेऊनही तिला परफेक्ट सीन देता आला नाही. ती सीन करताना घाबरलेली असल्याने हा सीन मात्र पूर्ण झाला नाही.

काही वेळानंतर मात्र सिनेमाचा नायक इम्रान हाश्मीने तिला या सीनबाबत समजावून सांगितले. त्यानंतर काही वेळाने तिला कम्फर्टेबल वाटल्यानंतर हे शूट इशाने पूर्ण केले. या सिनेमामधील काही स्टंट सीन करतानाही इशाला अडचण आली मात्र या अडचणीवर मात करत तिने हे शूट पूर्ण केले आहे. ‘राज-३’ या सिनेमात इम्रान व इशा गुप्तासोबत बिपाशा बसुची प्रमुख भूमिका आहे.